वसतिगृह, प्रतेकाने जीवनात अनुभवाव अस एक ठिकाण. इथे अनेक ठिकाण ची अनेक व्यक्ति तुम्हाला बघायला मिळतिल. इथे येणारा प्रत्येक व्यक्ति आपल्या मनात एक नवीन स्वप्न घेवून दखल होतो. स्वप्ना बरोबरच मनात एक भीती ही असते, ती म्हणजे घरापासून दूर रहाण्याची आणि तिथले इतर विद्यार्थी आपल्याशी कसे वागतील याची. परंतु काही दिवसांनी ही भीती तर दुर होतेच पण त्याच बरोबर आपणही कळत नकळत त्यांच्यातलाच एक हिस्सा झालेलो असतो. नंतर सुरु होतो तो नवीन आयुष्याचा प्रवास नवी स्वप्न नवी आशा उराशी बाळगुण.
प्रत्येक विद्यार्थी इथे एक वेगळच स्वप्न घेवून आलेला असतो इथे आल्यावर त्याच्या स्वप्नाना पंख फुटतात एक दिशा मिळायाला सुरुवात होते. पण कधी कधी काही वेगळच घडत, एखादा स्वप्न एक बघतो परंतु ध्येय काही तरी निराळ असत आणि खर्या आयुष्यात बनतो मात्र कहीतरी अलगच. पण हे काही असल तरी वसतिगृहाच्या आठवणी आणि अनुभव मात्र जीवनभर सोबत रहातात.
अश्याच काहिश्या आठवणीनी भरल होत माझही वसतिगृह, आजही जेव्हा ती मस्ती, तो धिंगाना,
आणि ती परिक्षेच्या काळातली स्मशान शांतता आठवाते तेव्हा अंगावर शाहरा उभा राहतो. अस वाटत की अजुनही थोड़ी मस्ती बकिच आहे, जर खरच वेळ थोड़ा मागे घेउन जाता आला असता तर.
आणि ती परिक्षेच्या काळातली स्मशान शांतता आठवाते तेव्हा अंगावर शाहरा उभा राहतो. अस वाटत की अजुनही थोड़ी मस्ती बकिच आहे, जर खरच वेळ थोड़ा मागे घेउन जाता आला असता तर.