Ransangram Pages
Friday, August 28, 2009
संस्क्रुती X संस्क्रुती
(महाराष्ट्र * बिहार)
महारष्ट्राच्या संस्क्रुतीची तुलना बिहारी संस्क्रुतीशी होणे केवळ अशक्य.
याच दर्शन नुकतच झालय. काही महीण्याआधी महाराष्ट्रात आपण डेक्कण-क्विण या रेल्वेचा ८० वा वाठदीवस साजरा केला होता. त्याच दिवशी बिहार मधे एक संपुर्ण रेल्वे जळण्याचा प्रकार घडला. हा केवळ योगायोग असु शकतो, आणि हाच योगायोग आज परत घडुन आलाय बरं का! आज दि. १८/०८/२००९ रोजी मुंबई महारष्ट्रात मेट्रो रेल्वे उभारण्याचे पाऊल उचलले गेले. दुसर्या टप्याच उद्दघाटन (भुमिपुजन) राष्ट्र-अध्यक्षा श्रिमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले. आणि आजच पटणा (बिहार) इथे परत एका रेल्वेचे ४ ए.सी. डब्बे जाळण्यात आले.
तोडफोड, जाळपोळ हाणामारी, गुंडगर्दी ही बिहारी संस्क्रुती. आम्ही प्रगती आणि उद्दारा मधे विश्वास ठेवतो आणि ते विनाशामधे. हाच मोठा फरक या दोन संस्क्रुती मधे. सगळ्यात जास्त गुन्हेगारीचं प्रमाण यु.पी.-बिहार मधे, भ्रष्टाचार, घोटाळे, निवडनुकीत बोगस मतदान, आणि अपहरण व खडंणी हे तर तीथल्या प्रमुख व्यवसायापॆकी एक.
नथ्थुराम व जसवंत
"देशाच्या विभाजना साठी जेवढे जिन्ना तेवढेच गांधीही जवाबदार आहेत." असे ठणकावुन सांगत त्यांच्या छातित ३ गोळ्या घालुन गांधी संपवनारे व स्वतःला पोलिसांच्या त्याब्यात देवुन फासी पत्करणारे ते नथ्थुराम विनायक गोडसे.
यांची आठवण आज या साठी येते आहे कि त्यांनी त्याच वेळी तडका फडकी निर्णय घेवुन हा मुद्दा जणते समोर मांडला, परंतु आजच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांना त्याचा साक्षातकार आज तब्बल ६३ वर्षानी झालाय. ह्यांनी तर गांधिनाच नव्हे तर नेहरु व सरदार पटेलांनाही त्या रांगेत आणुन ऊभ केलय.
ह्यांच्यात आणि नथ्थुराम गोडसे मधे फरक येवठाच कि त्यांनि गांधी संपवलेत व यांनी नेहरु ,पटेलांच्या परनोत्प्रांत बोललेत. आणि हो गोडसेंनी मात्र जिन्नाला जवाबदार मानल होत विभाजनासाठी, हे मात्र जिन्नाला क्लिन चिट देत आहेत......
आज पर्यंत दिल्लीत बसलेलं सरकार (जे कि आपल्याच नाकर्तेपणा मुळे निवडुन गेलयं ते) पाकिस्तानसाठी हळहळ व्यक्त करत होत, आज तर भाजप ही त्याच मार्गाने जातांना दिसतयं.
आवरा, पकिस्तान चे लाड बस करा.
बस झालेत जिन्नाचे गुणगान, पाकिस्तानची मॆत्री आणि कसाब चे लाड. आता माजु द्या पाकिस्तान विरुद्द रणसंग्राम.............
हल्ला बोल............................
निवडणुक २००९
नुकत्याच १५व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, केंद्रीय मंत्रीमंडळ हि स्थापन झाल. संपुर्ण महाराष्ट्रात व संपुर्ण देशात पक्षांनी भरघोस मते मिळवुन हि लोकसभा निवडनुक जिंकुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. सर्वाधिक २१६ जागा या पक्षानी मिळवत सत्ता स्थापन केली. व भाजप ला केवळ १६० जागां वरच समाधान मानावं लागलं. खरं तर जास्त नुकसान झाल ते कोग्रेस प्रणीत यु.पि.ए. मधुन बाहेर पडलेल्या व पडु इच्छीना-या घटक पक्षानां, उदा. लालुप्रसाद यादव, रामविलास पासवान ( जे स्व:ताही निवडुन येवु शकले नाहीत ) आणि पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहानारे आपले शरद पवार साहेब. ज्याच्या केवळ महाराष्ट्रातच ९ जागा येवु शकल्या. आणि यातल्याही काही जागा ह्या निच्शितच होत्या, जश्या कि माढ्यातुन खुद्द पवार साहेब, बारामति मधुन प्रथमच उभ्या असलेल्या त्यांच्या सुपुत्री सुप्रिया सुळे, साताराहुन स्वयंभु संभाजी राजे, यांना तसं पाहता निवडुन येण्यासाठी कुठल्याही पक्षाची गरज वाटत नाहि. या व्यतिरिक्त उरलेल्या ६ जागा राष्ट्र्वादीने मिळवुन मोठा तिर मारलेला दिसत नाहि. आणि स्वप्न होत ........... जावुं देत जखमेवर मिठ चोळायला नको.
Subscribe to:
Posts (Atom)