Wednesday, December 2, 2009

निखिल वागळे जरा साभांळुन......

झी मराठि वरील आमने-सामने या वाद-विवादाच्या कार्यक्रमातुन अधीकच प्रसिद्धीत आलेले निखिल वागळेंवर नुक्तिच शिवसेने कडुन पुष्प सुमने उधळल्या गेली आहेत. अहो म्हणजे मार खालायं, बाळासांहेबांवर उटसुट उलटसुलट व्यक्तव्य केल्या कारणाने हा प्रकार घडला. प्रत्येकाशी तडकाफडकी सरळ भाषेत बोलणारा माझा एक आवडता पत्रकार म्हणुन मि त्यांना पाहतो. परंतु कधी कधी खरचं फारच अती करताहो वगळे साहेब वटवट तुम्ही. हल्ला झाल्या नंतर पेटुन उठलेल्या निखिल वागळेंनी लगेचच संपुर्ण पत्रकार यंत्रणेला डोक्यावर घेउन आपण किती शक्तीशाली आहोत हे दाखवण्यासाठी आकांत-तांडव सुरु केला. लोकांनां आपण किती भोळे व आपल्यावर कसा शिवसेनेने अन्याय केला हे दाखवण्याचा आटा-पिटा सुरु केला. लोंकान कडुन exit poll मागितलेत, बिध्द्दास्त बोला कार्यक्रमात मते विचारले असता, त्यांची मते एकण्या एवजी स्वःताचिच वटवट अधिक होती. ति होणारच म्हणा कारण ४८ तासांच्या आत सरकारने शिवसेनेवर कारवाई कारा नाहीतर आम्ही शांत बसणार नाहीत आमची ताकद दाखवु म्हणनार्या वागळेंना एका प्रेक्षकांने एक सुंदर प्रश्न विचारुन शांत बसवल तो म्हणजे "४८ तासात कारवाई झाली नाही तर सरकार वर दबाव आणु म्हणता, आज तुमच्यावर हल्ला झाला म्हणुन ताकद आठवली, तेव्हा का सरकारवर दबाव टाकला नाही जेव्हा मुम्बंई वर हमला झाला, सरकारने त्यांना लवकरात लवकर फासी द्यावी म्हणुन का ही ताकद वापरत नाही तुम्ही? " प्रश्न एकुन गप-गार झालेले वागळे लगेचच विषयांतर करु लागलेत.
या सर्व प्रकारामुळे काही आधिक महत्वाच्या गोष्टी समोर आल्यात, या आधी महानगर दैनीकासाठी काम करणार्या वागळेंबरोबर त्यांचे साथिदार कपिल म्हणुन होते. त्यांनी दै. पुण्य नगरी मधे वागळेंच्या जुन्या कट कारस्थानांचा एक उत्तम लेख लिहला आहे जरुर वाचा. त्यातुन अस कळत की शिवसेनेशी त्यांच जुनच वैर आहे. कपिलजींच्या म्हणण्यानुसार त्या वेळेस महानगर दैनिकाचा विरोध म्हणुन तो जाळण्याचा ऊपक्रम शिवसेनेने हाती घेतला होता. याला घाबरुन वागळेंनी त्यावेळचे शिवसेनेचे नेते विठ्ठल चव्हाण व छगन भुजभळ (ते तेव्हा शिवसेनेत होते.) यांची मदत घेतली, ती मदत करत असतांना विठ्ठल चव्हाण येवठं हि म्हणाले कि जाउ द्या शेवटी मराठी माणुस आहे कशाला त्याच नुकसान करायच. परंतु शिवसेनेच्या भाषेत बोलायच झाल तर या ऊपर्यानी त्यांच विठ्ठल चव्हाणांच्या म्रुत्यु नंतंर ते गुंड होते असं ठरवुन विधानसभेत कशाला त्या साठी श्रध्दांजली वाहता हि नैतिकता आमदारांना शिकवण्याचा शाहाणपना यांनी केला होता. म्हणुन म्हणतोय वागळे साहेब जरा जपुनच बोला नाहीतर उगाच जनमाणसात पेटेल तुमच्या विरुध्द रणसंग्राम.................
उद्या तुमच्यावरच होईल हल्ला बोल.................

राऊतांना आलाय ऊत.............

गेल्या काही दिवसापासुन सामना मधे जे लेख बाळा साहेबांचे म्हणुन खपवले जात आहेत ते वाचुन आपल्या सारख्या सामान्य माराठी माणसांनी काय प्रतीक्रिया द्यावी हेच कळत नाही. कधी मराठी माणसांनिच पाठीत खंजीर खुपसला काय! तर कधी सचीन सारख्या महान क्रिकेट पटुवर सडकुन टिका. आणि महत्वाच काय तर तोही एक मराठी माणुस असतांना. बाळासाहेब आता ८०+ वर्षाचे झाले आहेत. मला तर वाटत आता ते या गोष्टीत लक्षही घालत नसतील. तस पहीले पासुन त्यांचा लाडका संजय ज्याला ते संज्या म्हणातात तेच सामनाचा कारभार पाहतात. मात्र आता संजय राऊतांनी जे काही सामनाचा आडोसा घेवुन चालवलय ते खरचं टिकेस पात्र आहे. संजय राऊत साहेब आपणास आमची नम्र विनंती आहे क्रुपया या सगळ्या गोष्टी जरा कमी करा सामन्य़ जणता व शिवसैनिकांना संभ्रमात आणु नका. त्यानंतर निखिल वागळेंवर हल्ला, हे प्रकरण वादाचच, ते बरोबर की चुक यात लक्ष न घातलेलच बरं, निखिल वागळे खरं तर माझे आवडते पत्रकार, परंतु त्यांची काहीच चुक नाही असंही मि म्हणत नाही. कारण एका हाताने टाळी वाजत नाही........
तरीही राऊत साहेब आपल्याला उगाच ऊत येवु देवु नका. पहीलेच मनसे मुळे बराच धक्का बसलाय त्यातुन सावरुन मराठी माणसांसाठी काम करणारी मराठी माणसांची आपली शिवसेना असा लैकीक परत पोहचवण्यासाठी धडपडण्या ऎवजी, मराठी माणसावरच हल्ले, जरा आवर घाला............

Friday, October 23, 2009

Online Gaming Industry

आज आपण प्रत्येक cyber cafe मधे बघतो कि बरीच लहान मंडळी computer मधे आपलं डोक घालुन games खेळतांना मग्न झालेले दिसतात. आजचि हि लाहान पिढी या gaming market चं प्रतिनिधित्व करतांना आपण पाहतोय. त्यांचे आवडते games आहेतDisney Toontow, Counter strike, ई. एक report असं सांगते कि आज Asia-Pacific भाग हा जगातला सगळ्यात जास्त Web games वापरनारा भाग आहेत. आणि येत्या काळात मात्र South Korea हा भाग हि जागा बळकवेल. व त्याबरोबरच जागतिक online gaming market हे $9.8 billion चा आकडा २०१० पर्यंत पार करेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. कारण फक्त लाहान मुलंच नाही तर मोठी माणसंही या online games चि दिवानी झालेलि दिसतात. आणि प्रत्येक महिण्यात 2 million पेक्षा जास्त unique visitors या market ला मिळालेली दिसतात. आणि महत्वाचं म्हणजे, एकुण 400,000 ते500,000 games दररोज खेळल्या जातात. ज्यांची नावे आहेत Pogo, Yahoo! Games,MSN Games ई. त्यातल्यात्यात सगळ्यात जास्त बायंकांच dedication या खेळात आपल्याला दिसतयं. परंतु एक महत्वाचा मुद्दा असा की हे online gaming market कितिही प्रसिद्ध असलं तरी सद्या ते मोठ्या प्रमाणावर revenue जमा करु शकत नाही आहे. ते पुर्णपणे छोट्या जाहिरात कंपण्यांवर अवंलंबुन आहेत. आता ते small add-on subscription fees किंवा game sales करुन supplement revenues मिळवण्याचा प्रयत्न करतांना दिसते आहे. तरीसुद्धा Online Gaming Industry आज हे सिद्ध करत आहे कि हि Industry बरीच attractive असुन बर्याच लोकांना ति आपल्याकडे diverse करती आहे. म्हणुन हा विश्वास आहे कि हि Industry येत्या काळात नक्किच प्रगती पथावर जाईल.

रणसंग्राम विधानसभेचे


चला लोकशहीतील आणखि एक उत्सव पार पडला. तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडनुक २००९ यातही परत निवडुन आली ति म्हणजे आघाडी. ६००० हुन जास्त शेतकरी आत्महत्तेच पातका सहीत,लोड शेडींग,माहागाई,२६/११ सारखे हल्ले, आणि ई महत्वाची पातक आपल्या डोक्यावर घेवुन हा आघाडी रुपी रावण परत या सोन्याहुन मौलवान माहाराष्ट्राला स्वतःच्याच शेपटीने पेटवत आलाय व पेटवत राहाणारच याची शपथ घेवुन आपली पुठची वाटचाल येत्या दिवसात सुरु करणार. आणि यांच बरोबर बरेचसे बुद्धीवादी म्हणवणारे रिकामटेकडे लोक आता यावर गल्ली पासुन दिल्ली पर्यंतच्या चर्चा करतांना प्रत्येक News Channel वर आढळतील. काल प्रर्यंत याच आघाडीला शिव्या घालणारे आता त्यांना शुभेच्छा देतांना व त्यांच्या पुढे लाळ गाळतांना आपल्याला दिसतील.
लाहाणपणि एक म्हण ऎकली होती ति म्हणजे "दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ" ति खरीखुरी या निवडनुकीत बघायला मिळाली. शिवसेना-मनसे भांडणात मग्न दिसलीत ज्याची आजीबात गरज नव्हती! का ते सांगतो पुढे, पण भाजपाला मात्र माणाव लागेल, लगेच आपल्या अपयशाच घापर ईतरांवर फोडुन मोकळी झाली आहे. आता ह्याना विचारमंथनाची गरज नाही कारण उत्तर सरळ सरळ समोर आहे युतीने मनसेशी उगाच भांडत बसण्यापेक्षा त्यानी आघाडीचा पर्दाफाश करण्यात वेळ खर्ची

शिवसेनेचे call center…..

भारतिय राजकारणाच्या ईतिहासात पहील्यांदा प्रत्येक सामाण्य माणसा पर्यंत त्यांच सरकार कसं पोहचु शकेल यांचि व्यवस्थित हाताळणि शिवसेनेनि केलेलि दिसतेय. त्यांनि सुरु केलयं call center, होय, ईथे तुम्हि तुमच्या भागातल्या समस्या १ call करुन सांगु शकता किंवा त्यांच्या वेबसाइट वर जावुन सुद्दा त्या नोंदवु शकता. जसे कि कचर्याशि निगडीत समस्या, आरोग्याशी निगडीत समस्या, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, शेतिशि निगडीत प्रश्न, हे व अश्या अनेक समस्यांचि त्यानंतर व्यवस्थित विल्हेवाट लावलि जाते. व ति समस्या ज्या विभागातुन नोंदवली जाते त्या विभागातिल विभागप्रमुख व शाखाप्रमुखाशी संपर्क साधुन त्यांच्या कार्यकर्तांकडुन ति समस्या तातकाळ सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. या समस्येंचा व कार्याचा report कार्याअध्यक्ष उद्धव ठाकरे व ईतर महत्वांच्या नेत्यांपर्यंत हमखास पोहचतो. ज्यामुळे कामात दिरंगाई होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.असा हा अत्भुत प्रयत्न सुरु तर झालाय परंतु तो फक्त शिवसेना भवन पुरताच. त्याला विधान भवनात राबवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहीले. परंतु हे स्वप्न भंगणार मात्र नाही नक्किच लवकरात लवकर ते पुर्ण होईल.

संविधानातिल सर्वोच्च पद















save earth



थोडीशी माहीति आपल्या भारतिय राजकारणातिल महत्वाच्या पदांची.
भारत स्वातंत्र झाला तेव्हा पासुन आज पर्यंत भारतिय संविधानातिल सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपति व प्रधानमंत्री पद,हि पदे भुषवलेल्या व्यक्तींची नावे व कार्यकाळ आपण खाली बघुयात……………………

Sunday, September 27, 2009

अहींसावादी हींसा करतात तेव्हा?

अहींसेचे देवता मा. गांधी व त्यंच्यांच विचारांवर उभारलेला त्यांचा पक्ष कोग्रेस, हा यांचे विचार व अहींसावाद संपुष्टात आणतांना दिसतोय. कारण, अश्या भरपुर घटना या दीवसात आपल्याला बघायला मिळत आहेत. आपल्याला आठवत आसेल तर काही महीन्याआधी सोनिया बाईंच्या सभेत विलासराव देशमुख व बांईन विरुद्ध काहींनी नारे बाजी केली तेव्हा त्यांना कार्यकर्त्यानी चांगलाच चोप दिला, व सोनिया बाई त्यांना चोप देवुन झाल्यावर म्हणाल्या "छोड दो उन्हे जाने दो", दुसरी घटणा झाली ति होती विलासरावांर त्यांच्या सभेत गोमुत्र फेकुन विरोध दर्शिविनार्या युवकासही चागंलाच चोपला होता. त्या नंतर आता राणे, सरवणकर यांनी निवडुक अर्ज भरायच्या दिवशी आदेश बांदेकर व त्यांच्या सहकारी शिवसॆनिकांबरोबर हातापायी केली, खरं पाहाता आचार संहीतेचा भंग राणेनी करुनही तेच वरचठ बोलत होते. तस पाहाता या फारच लाहान साहान घटना आहेत, कारण ईदींरा गांधींच्या हत्येच्या वेळी सगळ्यात जास्त सिख(सरदार) मारलेत ते या कोग्रेसनेच, आता परत एक घटना घडली

Thursday, September 24, 2009

विदर्भ म्हटलं कि ?

विदर्भ म्हटलं कि आठवत ते फक्त शेतक-यांची आत्महत्या, दुष्काळ, तपतं उन्हं,आणि कुपोषण. खरचं येवठ्यातच सामावलय का हो विदर्भ? नाही, जिच्या पोटी शिवबा जन्मला, जिच्या संस्कारामुळे त्याने महाराष्ट्र घडवला, ति जिजाऊ विदर्भाने दिली, अशिच एक विदर्भ कन्या जिने श्रिक्रुष्णाचा संसार फुलवला ती रुख्मिणिमाता, हे आणि या पेक्षाही ईथे बरचं काही आहे. महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा एक विभ्भिन्न अंग आहे. महाराष्ट्राचा पुर्व भाग व देशाच्या मध्यभागी आसलेला प्रदेश विदर्भ म्हणुन ओळखला जातो. विदर्भ हा दोन भागात विभागलेला आहे. नागपुर आणि अमरावती विभाग, नागपुर,अमरावती,अकोला ही विदर्भातील सगळ्यात मोठी महत्वाची शहरं आहेत. ही झाली विदर्भाची प्रार्थमिक माहीती, आता बघुया काय खास आहे विदर्भात?
विदर्भाचा इतिहास:
भगवान श्रीक्रुष्णाला भुरळ घालणारी त्यांची पट्टराणी माता रुख्मिणि ही विदर्भ कन्या, रुख्मिणि हरणाची ऎतिहासिक घटणा विदर्भातील उम्रावतीत(सध्याचे अमरावतीत) घडली, विदर्भातिल राजघराण्यांची वंशवाळ फार मोठि आहे. भिष्मक राजा त्याचा पुत्र दक्ष,त्यांचे वंशज बुद्धभानू हलदर,पछाकर,रिमुपमर्दन,चित्रसेन,भिम,दम्मनंद,भोज,क्रम आणि कौशिक हे भाऊ क्रम चा नातु भिष्मक व त्याचि मुलगी रुख्मिणि. त्यानंतर १८ व्या शतकातकाआधी नागपुर ही भोसल्यांची राजधानी होती. नंतर स्वातंत्रसग्रामातही विदर्भाने वेगळ स्थान बनवल. विदर्भातील सेवाग्राम गांधीवाद्यांसाठी राजधानी होती. स्वातंत्रा नंतर विदर्भ मुबंई महाराष्ट्रात विलिन झाला.
भौगोलिक:सातपुडाच्या पर्वत रांगा विदर्भा जवळ आहे पण मोठ्या प्रमाणात टेकड्या ईथे आढळत नाही. ऎथील मेळघाट जंगल व चिखलदरा हे प्रेक्षनिय स्थळे आहेत. चंद्रपुरातील ताडोबा जंगल सुद्धा पाहाण्या सारखं आहे. जगातील आश्चर्य असणारे खारं पाण्याच सरोवर बुलठाणा जिल्हात लोणार ईथे आहे. वैनगंगा हि सगळ्यात मोठि नदी आहे.

Wednesday, September 16, 2009

मला कसाब व्हायचंय

शिक्षक आम्हां विद्यार्थाना विचारायचे मोठे होवुन तुम्ही काय होणार कुनी म्हणे Doctor, कुनी Engineer, तर कुनी Lawyer, पण आज बघीतल तर या सगळ्यांपेक्षा जास्त कमाई, ईज्जत आणि Publicity या आतंकवाद्याना मिळत आहे, बघांना या लादेननी येवढ मोठ काम केल तरी तो आजुन मोकळा व येवठंच नाही तर त्यांच्या जिवनावर पुस्तके लिहली जातात, लादेनला सोडा, तो तर फार दुरचा माणुस आहे, आपल्या जावायाचचं बघा ना किती आरामात आहे तो सासुरवाडित. आपला जावाई म्हणजे कासाब बरं का! जावाई याच्या साठी म्हणतोय कारण आपल केंद्र सरकार बायको सारखं त्याच्याखाली लोळतांना, आणि भाऊजींचे लाड पुरवण्यासाठी मेहुणीने तडफडावं तशी न्याय व्यवस्था आपल्याला त्यांची लाड पुरवतांना दिसतॆ आहे. म्हणुन कसाब ला जावाई म्हतोयं. त्यातही त्याला मिळालेली प्रसिद्घि ति केवढी, तो सकाळी किती वाजता ऊठला, त्यानी काय नास्टा केला, तो काय जेवला, त्याने दिवसंभर काय केलं, कधी झोपला, येवठंच नव्हे तर त्याला शिखं आली तरी चार चार Doctor हजर, ईथे सामान्य माणुस आपली न्यायालयात खटला लढायला चागंला वकिल करता येत नाही म्हणुन खटला हरतो, पंरतु या कसाबला गरज नसतांनाही वकिल देण्यासाठी जिवाचं राणं केलंय, काही दळभद्री पुढाकार घेतांतही, कसाब सारख्यांच्याच बाबतीत बरा आठवतो यांना मानवाधीकार. म्हणुन म्हणतोय मला कसाब व्हायचंय,

Tuesday, September 8, 2009

हा अफजल असाच मेला हे त्रिकालाबाधित सत्य कुणीही नाकारू शकत नाही। आणि हे अफजल आसेच मारायला हवे । आणि मरायलाच हवे , आता बारी अफजल गुरुची आहे..............
पेटू दया रणसंग्राम............................
हल्ला बोल.......

Friday, August 28, 2009

संस्क्रुती X संस्क्रुती







(महाराष्ट्र * बिहार)
महारष्ट्राच्या संस्क्रुतीची तुलना बिहारी संस्क्रुतीशी होणे केवळ अशक्य.
याच दर्शन नुकतच झालय. काही महीण्याआधी महाराष्ट्रात आपण डेक्कण-क्विण या रेल्वेचा ८० वा वाठदीवस साजरा केला होता. त्याच दिवशी बिहार मधे एक संपुर्ण रेल्वे जळण्याचा प्रकार घडला. हा केवळ योगायोग असु शकतो, आणि हाच योगायोग आज परत घडुन आलाय बरं का! आज दि. १८/०८/२००९ रोजी मुंबई महारष्ट्रात मेट्रो रेल्वे उभारण्याचे पाऊल उचलले गेले. दुसर्या टप्याच उद्दघाटन (भुमिपुजन) राष्ट्र-अध्यक्षा श्रिमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले. आणि आजच पटणा (बिहार) इथे परत एका रेल्वेचे ४ ए.सी. डब्बे जाळण्यात आले.
तोडफोड, जाळपोळ हाणामारी, गुंडगर्दी ही बिहारी संस्क्रुती. आम्ही प्रगती आणि उद्दारा मधे विश्वास ठेवतो आणि ते विनाशामधे. हाच मोठा फरक या दोन संस्क्रुती मधे. सगळ्यात जास्त गुन्हेगारीचं प्रमाण यु.पी.-बिहार मधे, भ्रष्टाचार, घोटाळे, निवडनुकीत बोगस मतदान, आणि अपहरण व खडंणी हे तर तीथल्या प्रमुख व्यवसायापॆकी एक.

नथ्थुराम व जसवंत


"देशाच्या विभाजना साठी जेवढे जिन्ना तेवढेच गांधीही जवाबदार आहेत." असे ठणकावुन सांगत त्यांच्या छातित ३ गोळ्या घालुन गांधी संपवनारे व स्वतःला पोलिसांच्या त्याब्यात देवुन फासी पत्करणारे ते नथ्थुराम विनायक गोडसे.
यांची आठवण आज या साठी येते आहे कि त्यांनी त्याच वेळी तडका फडकी निर्णय घेवुन हा मुद्दा जणते समोर मांडला, परंतु आजच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांना त्याचा साक्षातकार आज तब्बल ६३ वर्षानी झालाय. ह्यांनी तर गांधिनाच नव्हे तर नेहरु व सरदार पटेलांनाही त्या रांगेत आणुन ऊभ केलय.
ह्यांच्यात आणि नथ्थुराम गोडसे मधे फरक येवठाच कि त्यांनि गांधी संपवलेत व यांनी नेहरु ,पटेलांच्या परनोत्प्रांत बोललेत. आणि हो गोडसेंनी मात्र जिन्नाला जवाबदार मानल होत विभाजनासाठी, हे मात्र जिन्नाला क्लिन चिट देत आहेत......
आज पर्यंत दिल्लीत बसलेलं सरकार (जे कि आपल्याच नाकर्तेपणा मुळे निवडुन गेलयं ते) पाकिस्तानसाठी हळहळ व्यक्त करत होत, आज तर भाजप ही त्याच मार्गाने जातांना दिसतयं.
आवरा, पकिस्तान चे लाड बस करा.
बस झालेत जिन्नाचे गुणगान, पाकिस्तानची मॆत्री आणि कसाब चे लाड. आता माजु द्या पाकिस्तान विरुद्द रणसंग्राम.............
हल्ला बोल............................

निवडणुक २००९

नुकत्याच १५व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, केंद्रीय मंत्रीमंडळ हि स्थापन झाल. संपुर्ण महाराष्ट्रात व संपुर्ण देशात पक्षांनी भरघोस मते मिळवुन हि लोकसभा निवडनुक जिंकुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. सर्वाधिक २१६ जागा या पक्षानी मिळवत सत्ता स्थापन केली. व भाजप ला केवळ १६० जागां वरच समाधान मानावं लागलं. खरं तर जास्त नुकसान झाल ते कोग्रेस प्रणीत यु.पि.ए. मधुन बाहेर पडलेल्या व पडु इच्छीना-या घटक पक्षानां, उदा. लालुप्रसाद यादव, रामविलास पासवान ( जे स्व:ताही निवडुन येवु शकले नाहीत ) आणि पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहानारे आपले शरद पवार साहेब. ज्याच्या केवळ महाराष्ट्रातच ९ जागा येवु शकल्या. आणि यातल्याही काही जागा ह्या निच्शितच होत्या, जश्या कि माढ्यातुन खुद्द पवार साहेब, बारामति मधुन प्रथमच उभ्या असलेल्या त्यांच्या सुपुत्री सुप्रिया सुळे, साताराहुन स्वयंभु संभाजी राजे, यांना तसं पाहता निवडुन येण्यासाठी कुठल्याही पक्षाची गरज वाटत नाहि. या व्यतिरिक्त उरलेल्या ६ जागा राष्ट्र्‌वादीने मिळवुन मोठा तिर मारलेला दिसत नाहि. आणि स्वप्न होत ........... जावुं देत जखमेवर मिठ चोळायला नको.

Thursday, August 13, 2009

Happy Indipedence Day to all my real Indians
माझ्या तमाम भारतीय बंधू - भगिनीना स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..........



Jay HO..................

Tuesday, July 28, 2009

जिहाद जिंदाबाद


SMILING KILLER: Hanif Syed, an auto driver and one of the three persons convicted by the special Pota court, is taken to Arthur Road Jail in Mumbai on Monday

A special Prevention of Terrorism Act (Pota) court on Monday found three persons, including a woman, guilty of carrying out the twin blasts at the Gateway of India and Zaveri Bazar in 2003, which had left 52 people dead. Hanif Syed, now 52, his wife Fehmida Syed, 49, and Ashrat Ansari, 38, now face the prospect of being sentenced to death for their heinous act
WHAT HAPPENED THAT DAY? Two powerful blasts took place almost simultaneously in two taxis on the afternoon of August 25, 2003। The first explosion took place at 1।05 pm at the crowded Zaveri Bazaar in Kalbadevi। Another blast took place just minutes later at the iconic Gateway of India। 52 people (36 at Zaveri Bazar and 16 at the Gateway) died and more than 100 were injured (Times Of India)
आता याला काय म्हणायचे??? ज्याने आतंकवादी करवाया मुंबई शहरात घडवून आणल्या आनेकांचे जीव घेतले तो न्यायालयात जातांना विजयाची खून दाखवत हसत हसत जातोय त्याला त्याच्या केलेल्या कामावर पश्च्याताप आजिबात दिसत नाही, उलट आनंद वाटतोय त्यानी जे केले त्याचा.......
आपल्या कमकुवत सरकारी धोरना मुलेच हे हरामी हनीफ जन्माला येतात। का अमेरिकेत ९/११ च्या हल्ल्या नंतर हमला झाला नाही????????? विचार करा .......
या कुत्र्या ला तर फाशी होणारच पण जो दूसरा कुत्रा कसाब नावाचा पिंजर्यात बंद आहे त्याला पहिला मारा....
नाहीतर ही पिसालालेली पाकिस्तानी कुत्री आपल्याला चावाल्या शिवाय राहणार नाही.........
त्यानी जिहाद जिंदाबाद बोलायच्या आधी गरजेचा आहे आपला भगवा
हल्ला बोल...............................

Monday, June 1, 2009

हल्ला बोल...........


हिंदू द्रोही म्हणजे फ़क्त पाकिस्तानी मुसलमान नव्हे , तर ते हिंदू जे कसाब आणि अफजल गुरु सारख्या आतंक्वाद्याना शय देतात ते सुद्धा द्रोही आहेत।
आता खरच अस वाटते की करकरे , कामठे, इ। ची बलिदान फुकट गेलेत।
मरा मरा अशीच तुम्ही मरा, आम्ही आहोत न तुमच्या नावानी रस्ते , चौक, बांधायला आणि तुम्हाला हुतात्मा घोषित करायला, नाही हो करकरे साहेब कसाब नाही मारणार तो जवाई आहे आमचा, आमच्या सरकारचा.

Friday, March 27, 2009

हिंदु नविन वर्षाच्या हर्दिक शुभेच्छा....

गुडी पड्व्याला विजयाची गुडी उभारा दारी सुख शांति नांदे घरी

जय हिंद.. जय माहराष्ट्र...........

लोकशाही आमच्या बापाची

आपल्याला प्रत्येक गावांमधे, शहारांमधे ठिकठिकांणी काही सुचना बघायला मिळतात. उदा. "इथे थुंकु नये", "इथे कचरा टाकु नये", "गाडी लाऊ नये", या सुचनांबरोबर कही मजेदार गोष्टी बघायला मिळतात त्या म्हणजे जिथे या सुचना लावण्यात आल्या आहेत तिथेच नेमका कचरा टकलेला आसतो, थुंलेल असतं, आणि नो पर्किंग मधे गाडी लावण्यात जी मजा असते ना ति काही ऒरच, काही दिवसांआधी जिवाची मुंम्बई करायाला गेलो होतो, तिथे छत्रपती शिवाजी टर्मिनल ला उतरलो। सगळीकडे बरीच स्वच्छता दिसत होती, मुंम्बा नगरी म्हणजे स्वप्ननगरी, गर्दीचा माहासागर तरीही बरीच स्वच्छता बघायला मिळणे म्हणजे खरचं आश्चर्य, पण ते जास्त वेळ टिकल नाही. कारण पुढे तिथल्या सब-वे मधुन जात असतांना मला एक सुचना दिसली ति होती "ईथे थुंकु नये थुंकल्यास कारवाई होइल" परंतु काही थुंकी बहाद्दुरांनी आधिच त्या फलका वरच थुंकुन कारवाई करुन ठेवली होती. काय करणार आमच्या लोकशांहीनी दिलेला अधिकार तो, अशी काहिंची समजुत, नंतर आपणच बोंबलत फिरायच आमच्या देशात किती घाण  आहे, अहो पण ति घानं केली कोणी, तुंम्ही आम्हीच ना, जर कोणि तुमच्या समोर घाण  करत असेल, कचरा टाकतं असेल तर त्याला फक्त सांगुन बघा कि इथे घाण करु नको बाबा, बघा तुम्हाला काय एकायला मिळत ते...... "ही काय तुझ्या बापाची जागा आहे काय?" किंवा "तुला काय करायंचयं?" अस काही तरी ऎकावं लागेल. काय करणार शेवटी लोकशही ना.
नो पर्किंग मधे गाडी लावणे, झेब्रा क्रोसींग च्या पुढे गाडी उभी करणे, या पेक्षा ही धाडसी काम म्हणजे सीग्नल तोडणे, अहो लोकशाही आमच्या बापाची ना कोण अम्हाला काय म्हणनांर आहे. जर पकडलीच गाडी तर देउ ५०, १०० मामांचाही खिसा गरम. आसाच हा भ्रष्टाचार वाढत असतो, याची पाळे-मुळे आपणच वाढवतो आणि नंतर आपल्या देशात केवढा भ्रष्टाचार, लवकरात लवकर याच निर्मुलन व्हायलाच हवं, अश्या काही तरी गप्पा मारत असतो.

Tuesday, March 17, 2009

"मजबुरो ने मजबुअरो को खुदा बना लिया"

आज सगळीकडे आतंकवादी कारावाया फारच माना वर करायला लागल्या आहेत . नुकताच झालेला मुम्बंईवरील हल्ला विसरता येन्या सारखा नाही, रोज १ नविन संघटना जन्माला येते आणि आपल्याला त्यांच्या जिहाद नावाच्या विक्रुत मनोव्रुत्तीला दररोज सामोरे जावं लागत. हे आपले शेजारी कुत्रॆ ईथे येवुन उन्नमात माजवतात, ह्यांचा हा गोंधळ आटपुन झाल्या नंतर आपल्या आदरनीय राजकारन्यांना कळतं की सुरक्शा व्यवस्था कमी पडतं आहे ति वाढवायला हवी, मगं आपल्याला सगली कडे बंदुकधारी सॆनिक बघायला मिळतात जे आपलीच कसुन चॊकशी करतात, जनु आपनंच बोंम्ब घेउन फिरतोय असे. असो त्यांचा तरी काय दोश ते त्यांच काम कारतायेत. परंतु हि सुरक्शा वाढवली तरी हे परत येतात कसे, आता प्रत्येक शहरात, प्रत्येक चॊकात तर पोलिस येउ शकत नाही. म्हनुन आपल्यालाच प्रत्येक वेळेस सतक्र राहवं लागनार आहे. हो हे आपल्यालाच कराव लागनार आहे कारण आपल्या केंद्रात बसलेल्या नाकर्त्या राजकारन्यानं कडुन काही होइल याची आपेक्शा नाहि. होय आदरनिय या शब्दावरुन नाकर्ते या शब्दावर यावं लागलं कारण ज्याला-त्याला त्याची लायकी दखवुन देने गरजेच असतं, माहित पडलं उद्या हे आफजल गुरु बरोबर, कसाब ला हि माफं करतीलं, करतीलं कायं केलचं म्हनुन समजा, त्या आबु सालेम ला निवडनुकिचं तिकीट देनारे, हे कसले आलेत आदरनिय, एक ५ वर्ष थांबा अफजल गुरु हि तुम्हालां लोकसभेत दीसेल, मुसलमानी मतांसाठी चाललेलं हे घानेरड राजकारनं किती दीवसं सहनं करायच, काय हो, पकिस्तानी आणि आतंकवादी मुसलमानांना माफ करुन तुम्ही कोनत्या मुस्लिमांची मते मिळवण्याचा प्रयत्न करतायं, भारतीय मुसलमानाला हे कधीचं मान्यं नाहि , आणि नकोच आसायला. मुसलमानांना हि विनंति आहे कि त्यांनी भला मोठा मोर्चा लोकसभेवर न्यावा आणि मागणी असावी अफ़जल गुरुला फ़ासी, तरचं हा एकोपा जुळेलं .
परवा पुण्याच्या एम. जी. रोडवारीवरील कोहिनुर होटेल मधे चहा पितांना कानावर काही शब्द आलेत आणि आपोआपच बाजुलच्या टेबल वरील संभाषना कडे माझ लक्श गेलं, ते वाक्य असं होत कि "मजबुरोने मजबुरोको खुदा बना लिया" खरं म्हणजे कोहिनुर होटेल हे मुसलमांन साठी राखीव आहे कि काय आसं वाटत पहिल्या टेबल पासुन ते शेवट प्रर्यंत फक्त तेच, आणि त्याच ठिकाणि मि हे वाक्य ऎकलयं ते हि एका व्रुद्ध सुशिकक्शित मुसलमानाच्या तोंडुन, त्यांच्या या बोलण्याचा अर्थ मला संपुर्ण संभाषन ऎकल्यावर कळला. त्यांचा अर्थ असा होता कि, ह्या आतंकवादी संघटनांचे म्होरके हे साले "आदत से मजबुर" आणि त्या ंच्यासाठी काम करनारे "गरीबी ऒर भुक से मजबुर". ही आहेत आमच्या हीदुंस्थातील मुस्लीमांच मतं, हो हे सगळं जरी बरोबर असलं तरी त्याची गरीबी आणि भुक तर आपण दुर करु शकत नाही. ति दुर राहावी म्हणुन आपण आधीच त्यानां ५५ कोटी फ़ाळनीच्या वेळेस दिले होते, त्याचा त्यांनी काय वापर केला हे आपणं बघतोच आहोत, कश्मीर काय, कारगिल काय, आता तर थेट मुम्बंई पर्यंत येवुन पोहचलेत हे साले. तो मुश्शर्फ एथे एउन परत परत कारगिल होइल आशि धमकि देतो आणि आम्हि त्यला जामा मशिदित पोलिस संरक्शनात नेतो नमाज पठायला, या नपुंसक राजकारन्यांन मुळे आपल्याला हे दिवस बघायला मिळतायेतं, तर आता वेळ आली आहे ह्यानां आपली म्हणजेच सामन्य जणतेचि ताकद दाखवायची,म्हणुन म्हणतो
हल्ला बोल.........................
जय हिंद, जय माहाराष्ट्र....