Monday, December 2, 2019

एका आई चे कथन


मि कोणि मोठी लेखिका नाही, राजकारणी तर नाहीच नाहि, किंवा कुठल्या विषिष्ठ धर्माची Follower ही नाही.

मि फ़क्त माझ्या चिमुकली ची आई आहे, मला काळजी वाटते, भीती वाटते आणि असुरक्षित असल्याची सतत जाणीव होत राहते, आजच्या समजाच विदरक रुप बघुन. मला अस जाणवत कि आज समजात कुठलीच मुलगी, स्त्री किंवा लाहान मुलही सुरक्षित नाही.

आज मला social media आक्रोशाने भरलेले अनेक messages, posts बघायला मिळतात, तर कुणि whats app वर काळे DP ठेवुन निषेध नोंदवताना दिसतात. त्यातले अनेक तर मुळ मुद्दा सोडुन भावनिक आणि धार्मिक विषयावर टिप्पणी करणारे अधीक असतात.

पण ह्याहुन अधिक आपण करु तरी काय शकतो?
मेम्बत्त्या जाळा! petitions Sign करा! social media च्या पोस्ट शेर करा, आणि सरते शेवटि एखादा धर्मिक मुद्दा पेटवा.

परवा निर्भया होती, काल आसिफ़ा, आज डॊ. प्रियंका रेड्डी आहेत, उद्या अजुन कोणितरी असेल. परंतू परिस्थिती ही काल आज आणि उद्या ही तशीच दिसत आहे.

काय अजुन आपण अश्या एखाद्या घटनेची वाट बघतोय ? शांत बसने म्हणजे अश्या विक्रुत माणसिकतेला खतपाणी घालण्या सारख आहे.

हि एकच घटना नाही आहे, अश्या अनेक घटना सतत घडत आहेत, काही आपण विसरलो आहोत तर कितितरी घटना पुढेच आल्या नसतिल.

किंबहुना ज्या घटना पुढे आल्या आहेत, त्यातले किती  आरोपी सिद्ध झालेत किंवा जे सिद्ध झालेत त्यातल्या किती लोकांना कठोर शिक्षा झाली. कित्तेक वर्ष जातात त्यांना आरोपी ठरवायला  आणि त्यांनंतर शिक्षेचीअंमलबजावणी करायला.

हा कसला कायदा? अरोपीने गुन्हा कबुल केल्या नंतर ही सरकार आणि न्यायालयाना औपचारिक प्रक्रिया पुर्ण करावी लगते हे सांगण्या साठि की ते गुन्हेगार आहेत ही नाही.

सध्या पुरता जणतेचा आक्रोश शांत करण्यासाठी आरोपी ना फ़क्त तुरंगात डांबुन पिडितेला न्याय मिळणार का?

No comments: