Friday, September 16, 2011

वेडेच इतिहास घडवतात.. आणि अण्णा वेडे आहे..


खबरदार जर तुम्ही भ्रष्टाचार विरुद्ध बोलत असाल, उपोषण करत असाल, किंवा वंदे मातरम म्हणत असाल तर तुम्ही  जातीय वादी आहात तुम्हाला जातीयवादी संघटना साथ देत आहे (मग ती संघटना देशभक्त का असोना ) आणि भारतात हिंदू संघटनानाच जातीयवादी म्हटलं जात बाकी इतर  जातीयवादा च्या आधारावर उभारलेल्या  संघटना  ह्या धर्मनिरपेक्ष आहेत. ह्याच्या हि पुठे जाऊन जर  खालील प्रकारची पत्र तुम्ही सरकार ला पाठवत असाल तर मग तुम्ही वेडे आहात आणि देश द्रोही आहात हे लक्षात ठेवा.
सध्या असाच काही प्रकार आपल्या देशात सुरु आहे, महाराष्ट्रातल एक अस व्यक्तिमत्व ज्याचं नाव "कि.बा.हजारे" आहे ज्यांना लाडाने अण्णा म्हणतात, उपहासाने छोटा गांधी आणि टीकेने वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून संबोधल जात ते छोट वादळ आज आपल्या केंद्र सरकार ला जाऊन भिडलंय.
 आणि त्यांच्या सोबत आहे केजरीवाल आणि किरण बेदी(माजी IPS  Officer), ह्या त्याच किरण बेदी ज्यांच्या धाडसाचे धडे आम्ही लहान पाणी शाळेत गिरवलेत  त्या आता सरकारच्या मते वेड्या  आहेत,  देशवीरोधी आहेत. जनालोकपाल साठीचा हा लढा खूप आधी पासून सुरु आहे, पण सरकार त्या कडे दुर्लक्ष करत होत पण आज मात्र जनतेच्या संतापाची लाट उसळली तेव्हा सरकारलाही नमाव लागल.
पण आजून हि कुर्खोडी संपलेली नाही, सरकार च्या एका WebSite वर अण्णा वेडे असल्याचा जावाई शोध लावलाय. आता आपल्या सारख्या सामान्य जनातेनीच न्याय करायला हवा.

अण्णा आणि Team नि सरकार ला जनलोकपाल बद्दल १४ ऑक्टोबर २०१० रोजी लिहिलेलं एक पत्र त्याच  website वरून घेतलेलं.... आणि website Link  हि दिलेली आहे जरूर बघा...
आणि लक्षात घ्या जर अण्णा खरच वेडे असतील तर चांगलंच आहे वेडेच इतिहास घडवतात.. आणि अण्णा वेडे आहे..


No comments: