Thursday, October 7, 2010

महाराष्ट्रा बाहेरील बाळ ठाकरे...

              महाराष्ट्राची एकमेव ओळख, एकमेव अभिमान म्हणजे,
"छत्रपति शिवाजी महाराज". महाराजांनी रक्ताच पाणी करुन महाराष्ट्राची बाग़ फुलवली, जो महाराष्ट्र देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर सर्वोतपरी प्रबळ ठरला होता. पण मध्यंतरिच्या काळात प्रतेका साठी आपली दारं  उघडी करुन देणारा महाराष्ट्र अनेकांच्या रंगात, रंगता-रंगता स्वतः चा रंग विसरायला लागला होता. परत गरज होती ती मराठी चा स्वाभिमान जागवण्याची, मराठी माणसाला एकत्र आणण्याची आणि ते काम घडल माननीय शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे यांच्या कडून, पण त्याच बरोबर त्यांच्या वर बरीच टिका ही झाली. आजही बरीच महाराष्ट्रातलीच मराठी माणस त्यांच्यावर टिका करायला मागे पुढे पाहत नाहित.
        पण याच्याच उलट जेव्हा आपण महाराष्ट्रा बाहर जातो, तेव्हा महाराजां नंतर महाराष्ट्रा ची ओळख होते ती बाळा साहेब ठाकरे यांच्या नावानेच. मग ते बाहेरील प्रांतात असो की देशात, महाराष्ट्रा बाहर जेव्हा जातो तेव्हा साहजिक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे "Where are you from?"  महाराष्ट्र अस सांगितल्या वर "बाळ ठाकरे" असा काहीतरी reply  त्याच्या कडून मिळतो. काल पर्यंत ज्यांना
आपण महाराष्ट्रात राहून Fundamentlist म्हणत होतो आचानक आपण त्यांचे गुणगान गायला लागतो. त्या प्रांतात गेल्या नंतर तिथल्या लोकांच त्याच्या मात्रुभाषेवारिल वरील आणि त्यांच्या संस्क्रुतिवरिल प्रेम पाहून बाळा साहेबांच्या गोष्टी मनाला पटायला लागतात.
 मग अचाणक एखादा मराठी माणूस भेटल्यावर त्याचाशी मुद्दामुण मराठीतच बोलावस वाटत, त्याच्या Computor वरील बाळा साहेबांचा Wallpaper बघुन, लपून छपून का होईना आपणही एखादा Photo खिश्याच्या पकितात नाहीतर घरात ठेवतो, हे गोष्ट सगळेच करतील असही नाही पण मनात मात्र सगाल्याच्या असत.
         डॉ. अभिराम दीक्षित यांनी आपल्या औरंगाबाद च्या एका सभेत कही किस्से सांगितले होते. ते कुठे तरी परदेशात गेले असताना त्याना कोणी तरी तिकडच्या मनासानी विचारले की "तुम्ही कुठचे ?", मी (महाराष्ट्र) भारतात ला म्हटल्या वर तो व्यक्ति म्हणाला " oohh, there is one leader Called Bal Thakare, am i right?".
तसाच आणखी एक किस्सा  अभिराम दिक्षितानी संगीताला तो असा की, त्याच परदेशात ते  एका मराठी कुटुंबा कड़े गेले असता तिथे त्यांना  त्या घरात बाळा साहेबांचा एक मोठा Photo दिसला. त्यानी सहाजिकच त्या गृहस्ताला विचारल असता तो म्हणाला की हां Photo लावल्या मुळे आम्हाला महाराष्ट्रात असल्या सारख सुरक्षित वाटत.
      तात्पर्य अस की बाळा साहेब हे एकमेव व्यक्तिमत्व महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेरही तेवढच प्रसिद्द आहे.
म्हणुनच बाळा साहेबांना प्रतेक महाराष्ट्रीयांच्या, प्रतेक हिंदुच्या हृदयावर राज्य करणारा, ह्रदय सम्राट, हिंदू ह्रदय सम्राट बाळा साहेब ठाकरे म्हणतात.

1 comment:

विक्रम एक शांत वादळ said...

chan post

jay maharashtra

kahi divasapurvi mihi majhe mat yababat majhya Blogvar mandle hote :)